लोणावळ्यात जितेंद्र कल्याणजी यांचा गौरव! सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘कर्तव्यभूषण व प्रेरणा’ पुरस्कार प्रदान

SHARE NOW

लोणावळा :

लोणावळा नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र धीरूभाई कल्याणजी यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘कर्तव्यभूषण व प्रेरणा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साप्ताहिक अंबरच्या 36 व्या वर्धापन दिन सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सोहळ्याला साप्ताहिक अंबरचे संस्थापक संपादक सुरेश साखळकर, लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, डॉ. सुनील तांबे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरविंदभाई मेहता, नंदकुमार वाळुंज, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनय विद्वांस, संपादक अतुल पवार, सहसंपादक प्रशांत पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Advertisement

जितेंद्र कल्याणजी हे लोणावळा शिक्षण मंडळाचे माजी सभापती असून मावळ वार्ता फाउंडेशनचे माजी अध्यक्षही आहेत. लोणावळा शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे.

शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी विद्यार्थी-केंद्रित अनेक उपक्रम राबवले असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या वडिलांनी, धीरूभाई कल्याणजी यांनी सुरू केलेल्या फिरत्या शाळेच्या उपक्रमातून स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळाली होती. त्याच प्रेरणेने जितेंद्र कल्याणजी यांनीही शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

नगरपरिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांच्या धर्तीवर शिक्षण व गणवेश मिळावा यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. तसेच विद्यार्थी जीवन विमा योजना आणि जागो हिंदुस्तानी, दहीहंडी यांसारख्या सामाजिक उपक्रमांमध्येही ते सक्रिय आहेत.

त्यांच्या या सर्वांगीण कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला लोणावळा शहर व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page