इंद्रायणी विद्या मंदिर- यशोदा महादेव काकडे अभियांत्रिकी महाविद्यालयात डर्मेटोलॉजी आणि सायकिएट्री सत्र

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:

 

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि पुष्पलता डी वाय पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे व कार्यवाह चंद्रकांत शेटे आणि खजिनदार सौ निरुपा कानेटकर यांच्या मार्गदर्शनानुसार
सर्व शाखांमधील प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी डर्मेटोलॉजी आणि सायकिएट्री या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर स्वरूपा लुंगे पाटील आणि डॉक्टर मनोज घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्वचा आणि केसांचे प्रश्न आणि त्यासाठी घ्यावयाची काळजी आणि स्ट्रेस मॅनेजमेंट,वर्क लाइफ बैलेंस, रोजच्या वापरातील कॉस्मेटिक निवडताना घ्यावयाचा काळजी याबाबत विद्यार्थिनींना प्रेरणादायी माहिती दिली.

Advertisement

याप्रसंगी डी वाय हॉस्पिटलच्या ऑपरेशन एग्जीक्यूटिव लोचना,महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. अमृता सुराणा, इंजीनियरिंग शाखेच्या सर्व महिला शिक्षिका आणि स्टाफ,आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रा. अमृता सुराना यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. तृप्ती शिंदे यांनी केले. अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी या सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page