समाजपरिवर्तन घडविण्यात स्त्रीशक्तीचं मौलिक योगदान!..ॲड.विजया भांडवलकर,ध्यास केअर्स फाउंडेशन पुरस्कृत महिला दिनानिमित्त कार्य गौरव पुरस्कार सोहळा!

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

ध्यास केअर्स फाउंडेशन मावळ पुरस्कृत नुकताच कौशल्य विकास केंद्र सभागृह तळेगाव दाभाडे येथे जागतिक महिला दिनानिमित्त पुणे‌ पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ६ महिलांना कार्य गौरव पुरस्काराने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले.आज समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषांच्या बरोबरीने काम करते प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे भक्कमपणे उभी असते समाजपरिवर्तन घडविण्यात स्त्रीशक्तीचं मौलिक योगदान आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विधीतज्ञ, माजी नगराध्यक्षा ॲड विजया भांडवलवर यांनी करताना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व भारतीय संस्कृतीचे महत्त्व विशद केले.तर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आत्मसात करून भारतीय संस्कृतीचा वसा आणि वारसा जपण्याचं काम आजची स्त्री पुरुषांच्या बरोबरीने भक्कमपणे करीत आहे. प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च पदी कामातुन आदर्श निर्माण करणा-या सावित्रीच्या लेकींचे समाज विकासात महत्त्वपूर्ण योगदान आहे असे प्रतिपादन रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी करताना महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या व ध्यास केअर्स फाउंडेशनच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.रोटरी सिटीचे सेक्रेटरी संजय मेहता यांनी पुरस्कार प्राप्त महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या व स्तूत्य उपक्रमाचे कौतुक केले.संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी विविध उपक्रमांची माहिती, उद्देश, हेतू व महत्त्व संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक देविदास आडकर यांनी प्रास्ताविकाद्वारे कथन केले.आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरस्कारर्थी महिलांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.*

Advertisement

*विविध क्षेत्रातील खालील मान्यवर महिलांना कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित केले.*

*१)सौ. पल्लवी माळवे(उद्योजकता कार्य गौरव पुरस्कार)*

*२)सौ.स्वाती मुठे (सामाजिक सेवा कार्यगौरव पुरस्कार)*

*३)सौ.मनिषा गाडे (शैक्षणिक सेवा कार्यगौरव पुरस्कार)*

*४)सौ.रेखा भेगडे (उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार)*

*५) सौ.कल्याणी परदेशी (वास्तू शास्त्र कार्य गौरव पुरस्कार)*

*६)सौ.दिपाली जांभूळकर (सांप्रदायिक सेवा कार्यगौरव पुरस्कार)*

*संस्थेचे अध्यक्ष प्रा.देविदास आडकर,सचिव बळीराम औटे,निलेश ठाकर, नवनाथ आडकर,राहुल सुर्यवंशी इ.नी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

कैलास भुजबळ, रणजित ठाकूर, महेश भागीवंत,भरत,दिनेश नीलकंठ,अनिल राऊत,आडकर,अमर जाधव, संध्याताई देसाई, संगीताताई डेरे, अनुराधा भवार, माधुरी गावडे,साक्षी गायकवाड,सौ बुवा,रेश्मा दरेकर उपस्थित होते

खेळ रंगला‌ पैठणीचा,होम मिनिस्टर फेम, सर्वोत्तम निवेदक प्रा.लक्ष्मण शेलार यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.*


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page