देहूरोड गुरुद्वारात श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी पर्वानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रम
देहूरोड :

हिंद-दी-चादर, शीख समाजाचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी पर्वानिमित्त व गुरतागदी श्री गुरू गोविंद सिंग जी महाराज यांनाही गुरुतागदी ,ही पदवी मिळाली त्यास साडे तीनशे वर्ष पूर्ण झाल्याने देहूरोड येथील गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा यांच्या विद्यमाने २३, २४ आणि २५ नोव्हेंबर २०२५ रोजी विविध भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या समागमात भाई अरविंदर सिंह जी धामी, ग्यानी हरभजन सिंह जी, ग्यानी सोहन सिंह जी आणि ग्यानी मणजोत सिंह जी यांच्या कीर्तन व कथा सेवेचा लाभ भाविकांना मिळणार आहे.तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
गुरु तेग बहादूर साहिब यांच्या शहीदी पर्वात भाई मति दास जी, भाई सती दास जी आणि भाई दयाला जी यांच्या अमर शहिदीची आठवण, देशभक्तीचे संस्कार व समाजात सद्भावना जागविण्यासाठी या धार्मिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व आहे.
*२३ व २४ नोव्हेंबर २०२५ : महान प्रभातफेरी व दिवाण*
महान प्रभातफेरी – सकाळी ६.३० पासून
प्रभातफेरी मार्ग :
गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा → बॉबी दा ढाबा → संतोष हॉटेल → सावना गार्डन चौक → वृंदावन हॉटेल → सबजी मंडी → सुभाष चौक → गुरुद्वारा सभा.
*दिवाण (सकाळ व संध्याकाळ)*
०७.३० ते ०८.३० – कीर्तन : ग्यानी सोहन सिंह जी
०६.३० ते ०७ .००.– सोदर रेहरास साहेब
०७.००. ते ०७ .४५ – कीर्तन : ग्यानी सोहन सिंह जी
०७ .४५ ते ०९.३० – कीर्तन : भाई अरविंदर सिंह जी धामी
०९.३० ते ०९.४५ – अरदास व संपती – त्यानंतर गुरु का लंगर
२४ नोव्हेंबर रोजी प्रभातफेरी वगळता इतर सर्व धार्मिक कार्यक्रम वरील वेळेनुसारच होतील.
*२५ नोव्हेंबर २०२५ – मंगळवार*
सकाळचा दिवाण
०७.३० ते ०८.०० – संपती : श्री अखंड पाठ साहेब
०८.०० ते ०८.३० – कीर्तन : ग्यानी सोहन सिंह जी
१०.०० ते १०.३० – कीर्तन : ग्यानी हरभजन सिंह जी
१०.३० ते ११.३० – कीर्तन : ग्यानी सोहन सिंह जी
११.३० ते १२.३० – कथा : ग्यानी मणजोत सिंह जी
१३.३० ते २०.१५ – कीर्तन : भाई अरविंदर सिंह जी धामी
०२.१५ ते ०२.३० – आभार प्रदर्शन
०२.३० ते ०२.४५ – संपती व अरदास – त्यानंतर गुरु लंगर
*सायंकाळचा दिवाण*
०६.३० ते ०७.०० – सोदर रेहरास साहेब
०७.०० ते ०७.३० – कीर्तन : ग्यानी सोहन सिंह जी
०७.३०ते ०८ .३० – कथा : ग्यानी मणजोत सिंह जी
०८ . ते १०.०० – कीर्तन : भाई अरविंदर सिंह जी धामी
१०.०० ते १०.१५– अरदास व संपती – त्यानंतर गुरु लंगर
*विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग*
पुणे जिल्हा सकल शीख समाजाच्या वतीने, शहीद गुरु तेग बहादूर यांच्या राष्ट्रकार्यास दिलेल्या उदात्त योगदानाची जाण नव्या पिढीला व्हावी, देशभक्तीचे संस्कार रुजावेत या हेतूने २४ नोव्हेंबर रोजी इयत्ता ९वी ते १०वीतील विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुरु साहिबांच्या त्याग, कर्तृत्व आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणादायी शिकवण दिली जाणार आहे.
*सर्व समाजबांधवांना आवाहन*
गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा, देहूरोड चे अध्यक्ष गुरुमितसिंग रत्तु यांनी आवाहन केले आहे की,
“तमाम शीख बांधव तसेच सर्व जाती–धर्मीय बंधू–भगिनींनी या पवित्र शहीदी समागमास उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.”






