आळंदीत माऊलींचे पालखीचे हरिनाम गजरात सीमोल्लंघन श्री राम पालखीची माऊली मंदिर प्रदक्षिणा हरिनाम गजरात

SHARE NOW

आळंदी : येथील खंडोबाचे माळरानावर माऊलींचे पालखीसह श्री रामाची पालखी, श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज पालखी, श्री भैरवनाथ महाराज ग्रामदैवत पालखी हरीनाम गजरात विजया दशमी दिनी सीमोल्लंघन हरिनाम जयघोषात उत्साहात साजरे झाले. श्रींचे सीमोल्लंघन प्रसंगी भाविक, नागरिकांनी पालखीतील श्रींचे दर्शनासह श्री खंडोबा देवदर्शनास खंडोबा माळरानावर मोठी गर्दी केली होती.

अलंकापुरीतील प्रथा परंपरेने श्री खंडोबा मंदिर माळरानावर श्रींचे सर्व पालखी सोहळ्याचे हरिनामम गजरात स्वागत आणि आदरातिथ्य येथील ग्रामस्थ कुऱ्हाडे पाटील परिवार, पदाधिकारी यांचे वतीने करण्यात आले. या प्रसंगी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील. व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, आळंदी ग्रामस्थ, नगारखाना प्रमुख सचिन रानवडे, स्वप्नील भोसले, आवेकर भावे रामचंद्र संस्थान सरपंच ऍड राहुल आवेकर, विश्वस्त अर्जुन मेदनकर, अविनाश गुळुंजकर, रमेश मसुडगे, लक्ष्मीकांत दंडनाईक, माजी सरपंच जेष्ठ विश्वस्त बिपीन चोभे, विश्वस्त गजानन काळे, नरहरी महाराज चौधरी श्रींचे सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे, बाळासाहेब रंधवे, स्वामींचे पुजारी काका गांधी, माऊलींचे मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे, दिनेश कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, संतोष मोझे, योगेश आरु, मंगेश आरु, माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर पाटील, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, श्रीधर कुऱ्हाडे, बापू कुऱ्हाडे, महेश कुऱ्हाडे, हरिश्चंद्र कुऱ्हाडे, रयतक्रांती शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते गजानन गाडेकर, मालक राजाभाऊ आरफळकर यांचे सह आळंदीतील विविध मंदिर देवस्थानचे प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ, भाविक, आजी माजी नगरसेवक, नगराध्यक्ष तसेच वारकरी, भाविक, साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री खंडोबा मंदिर माळरानावर परंपरेने शहरातून नागरिक, भाविक यांनी श्रीचे पालखीचे दर्शनास गर्दी केली. टाळ, मृदंग, वीणेच्या त्रिनादात दिड्यातील भाविक श्रींचे पालखीसह नामजयघोष करीत श्री खंडोबाचे दर्शनासह श्रींचे पालखी दर्शन आणि सीमोल्लंघनास उपस्थित होते. विजया दशमी निमित्त माऊली मंदिरात पहाटे घंटानाद, काकडा आरती, पवमान अभिषेक पूजा, भाविकांच्या महीम्न पुजा, अभिषेक, भाविकांचे श्रीचे संजीवन समाधी दर्शन, श्रीना महानैवेध्य, खंडोबा मंदिर समीप शमी पूजन, विना मंडपात प्रवचन सेवा उत्साहात झाली.

Advertisement

श्रीचे सर्व पालखीचे शाही लवाजम्यासह सीमोल्लंघनास हरिनाम गजरात विविध मंदिरातून आगमन झाले. आळंदी देवस्थान तर्फे श्रींची पालखी मंदिरात परत आल्यानंतर धुपारती त्यानंतर श्रीची नित्य नैमितिक पूजा आरती, गुरुवारची पालखीची पुन्हा मंदिर प्रदक्षिणा, आरती, पूजा, विजया दशमी निमित्त आळंदीतील श्री रामाची, श्री स्वामी महाराज यांचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा आणि मंदिरात आगमना झाले. मंदिर प्रदक्षिणा करून श्रींची पालखी पुन्हा श्री राम मंदिर, श्री नरसिव्ह सरस्वती मंदिर आणि श्री भैरवनाथ पालखी श्री भैरवनाथ मंदिरात हरिनाम गजरात आणण्यात आली. यावेळी आवेकर भावे रामचंद्र संस्थान मध्ये पदाधिकारी, सेवक, पसायदान गुरुकुल संस्था प्रमुख योगेश महाराज वाघ, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था, शिवतेज मित्र मंडळ आदींना तसेच माऊली मंदिरात आळंदी देवस्थानतर्फे मानकऱ्यांना नारळ प्रसाद देण्यात आला. खंडोबा माळरानावरील श्री खंडोबा मंदिर देवस्थान तर्फे सर्व पालख्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी विश्वस्त पदाधिकारी यांचा श्रीफळ, शाल देऊन आळंदी ग्रामस्थ कुऱ्हाडे पाटील यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

विजयादशमी दसरा आणि नवरात्रीतील प्रथा परंपरांचे पालन करीत आळंदीत संस्कृती जोपासण्यास प्राधान्य देण्यात आले. सोन्याचे प्रतिक असलेली आपट्याची पाने भाविक,नागरिकांनी एकमेकांना देत चांगले विचार जोपासण्याचा संदेश दिला. आळंदीतील मंदिरात भाविकांनी दर्शनास तसेच प्रागंणात नव्या गाड्यांचे पूजनास गर्दी केली. श्रींचे सीमोल्लंघन प्रसंगी श्रींचे पालख्यान समोर भजन ,अभंग, आरतीत भाविक तल्लीन झाले. नागरिकांनी यावेळी उत्स्फूर्त दाद दिली. पालखी मार्गावर भाविक, नागरिकांनी, फळ, पुष्प, भाजी विक्रेते यांनी सर्व पालख्यानवर पुष्पवृष्टीय केली. रांगोळ्यांचे पायघड्या, पुष्प सजावट आणि श्रींचे वैभवी दर्शन घेत भाविकांनी विजया दशमी दसरा साजरा केला.

श्रींचे पालखी मार्गावर दुतर्फा नागरिकांनी श्रींचे दर्शन घेतले. येथील भाईचारा फाउंडेशन कार्याध्यक्ष सुलतान शेख यांनी पालख्याचे स्वागत केले. यावेळी क्रांती पार्क मधील नागरिक उपस्थित होते. आळंदीत विविध ठिकाणी विजया दशमी दसरा निमित्त नवोपक्रमांची सुरुवात झाली. विविध व्यापारी आस्थापनांमध्ये गृहोपयोगी वस्तूंचे खरेदीस ग्राहकांनी मोठी गर्दी केली. आळंदी तीर्थक्षेत्रात परंपरेचे पालन करीत विजया दशमी साजरी करण्यात आली. सीमोल्लंघन प्रसंगी भाविकांनी सोन्याचे प्रतीक असलेली आपट्याची पाने भेट देत एकमेकांना आलिंगन देत गळा भेट घेत उत्साहात शुभेच्छा दिल्या. आळंदी येथील पद्मावतीदेवी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत नवरात्रोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी आळंदी देवस्थान आणि रानवडे परिवार यांनी भाविकांचे स्वागत करीत सेवासुविधा देत कमी वेळेत भाविक, महिला, पुरुषांना देवदर्शनची व्यवस्था, गावकरी भजन सेवा नवरात्र उत्सवात रुजू करीत परिश्रम घेतले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page