ॲड पू वा परांजपे विद्या मंदिर तळेगांव दाभाडे प्रशालेत महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

ॲड पू वा परांजपे विद्या मंदिर तळेगांव दाभाडे प्रशालेत महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा*

Advertisement

नवीन समर्थ विद्यालय प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका, कुशल प्रशासक, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने झटणारे कार्यतत्पर व्यक्तिमत्व माननीय श्रीमती इरावती केतकर मॅडम मुख्याध्यापक श्री.पांडुरंग पोटे सर,शिक्षक प्रतिनिधी सौ.आशा आवटे मॅडम,जेष्ठ अध्यापिका सौ.रजनी बधाले मॅडम,* सौ अनिता नागपुरे मॅडम व सर्व महिला अध्यापिका यांच्या शुभहस्ते विद्येची देवता सरस्वती,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून प्रशालेत कार्यरत असणाऱ्या सर्व महिला भगिनींच्या सन्मानाचे आयोजन सर्व अध्यापकांनी केले. उपस्थितांचे शाब्दिक स्वागत व महिलादिनाचा उद्देश ज्येष्ठ अध्यापक श्री. राम कदमबांडे सर यांनी स्पष्ट केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक श्री.पांडुरंग पोटे सर यांनी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर महिला भगिनींच्या कार्याचा गौरव करून सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुण्या,मार्गदर्शक इरावती केतकर मॅडम यांचा प्रशालेच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. प्रशालेतील विद्यार्थी आयुष डोलारे, विद्यार्थिनी * भावना सोनवणे व देविका कांबळे यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रशालेतील अध्यापिका सौ.सुवर्णा काळडोके मॅडम यांनी महिलादिनाचे औचित्य साधून केलेल्या सन्मानाबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद दिले. मार्गदर्शिका इरावती केतकर मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून महिला दिनाची आवश्यकता स्पष्ट करून स्रीची प्रतिमा जपत तिचा सन्मान करणे. स्त्रियांनी देखील मिळालेल्या संधीचा उपयोग करून कणखर बनले पाहिजे. समाजाने देखील तिचा कणखरपणा स्वीकारला पाहिजे. समाज निकोप व्हायला हवा असेल तर महिलांना संधी देणे गरजेचे हा अनमोल प्रेरक विचार सुधा मूर्तींच्या गोष्टीतून समजावून सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ अध्यापक श्री.संजय खराडे सर यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक प्रतिनिधी श्री.संपत गोडे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page