राजाराम मिंकू पगारे स्टेडियम, खराडी – पुणे येथे भव्य राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धा संपन्न
पुणे : राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांच्या परंपरेला पुढे नेत २० ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राजाराम मिंकू पगारे स्टेडियम, खराडी – पुणे येथे भव्य राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमुळे देशभरातील नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर आपली क्षमता सिद्ध करण्याची ही गौरवशाली संधी मिळाली. देशातील विविध राज्यांतील दगड ५०० हून अधिक खेळाडू, प्रशिक्षक, तांत्रिक अधिकारी, तसेच वेगवेगळ्या राज्य संघटनांचे मान्यवर पदाधिकारी स्पर्धेस उपस्थित राहिले. महाराष्ट्रासोबत त्रिपुरा, मेघालय, पश्चिम बंगाल, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा, केरल, तामिळनाडू, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, चंदीगढ इत्यादी राज्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला होता. यामुळे राष्ट्रीय किकबॉक्सिंग फेडरेशनची प्रतिमा तसेच महाराष्ट्राच्या क्रीडायशालीचा गौरव वर्धिष्णू झाला.
या भव्य उद्घाटन प्रसंगी मा. नगरसेविका क्रांती बॅनर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच मान्यवर उपस्थितांमध्ये मा. सरपंच शिवाजी मामा ढुले, ग्रामसेवक पाटोळे, माजी सैनिक संघटनाचे जिल्हाध्यक्ष श्री. धायगुडे, आजी माजी उपसरपंच सुमित आपटे उपस्थित होते. महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष सी. ए. तांबे, महाराष्ट्र किकबॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष बापूसाहेब ढुले यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
स्पर्धेच्या अध्यक्ष व चार वेळा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता अनिल ढुले संजय ढुले समिती तर्फे निर्मित ‘मिंकू स्पोर्टस्’ संस्थेच्या वतीने अध्यक्ष व किकबॉक्सिंग राष्ट्रीय तांत्रिक चेअरमन संजय ढुले तसेच राष्ट्रीय शरीरसौष्ठव संस्थेच्या अध्यक्ष पी. बाबु, भारत किकबॉक्सिंग राष्ट्रीय रिंग स्पोर्टस् समिती सदस्य व आंतरराष्ट्रीय खेळाडू जावेद महबूब सय्यद, संगीता गादीगुडे, समिती प्रमुख मिलिंद शिरगुडे, कैलास टिकाळे, सदस्यता सौ. सोनाली शिंगाडे-भालेराव, पल्लवी किने, चिंतन किने, प्रियंका किने, वैशाली खुळे, बंटी शेख, युवराज चोपडे, नवीन काले, विवेक मोहीते यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी, पदकं, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. भारतीय किकबॉक्सिंग फेडरेशनचे राष्ट्रीय तांत्रिक अध्यक्ष संजय ढुले यांनी मार्गदर्शन केलेल्या संघांनी मनमोकळा खेळ सादर केला. तसेच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनास मदत दिली. देशातील होलोक किकबॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक क्षमतांच्या सिद्ध करण्याची मोलाची अवसर या स्पर्धेमुळे मिळाली.






