भोसरी येथील शेठ रामधारी रामचंद्र आगरवाल प्राथमिक विद्यालयात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
भोसरी

यावेळी वरिष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ.प्रिया बगाडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .त्यांनी आपल्या व्याख्यानातून महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी तसेच कुटुंबामधील महिलांची भूमिका याविषयी अनमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. तसेच समाजासाठी विशेष कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिला राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, अहिल्याबाई होळकर यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. .
त्यानंतर कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री ज्ञानेश्वर तरस हे होते. प्रमुख पाहुणे संचालिका सौ सुखदा देशपांडे व विजया सराफ यांनीही महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला पालक उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिनकर मुंडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक श्री विक्रम देशमुख यांनी मांडले.






