**वडगाव नगर पंचायत चा विकास आराखडा (डी.पी.प्ल्यान ) बिल्डर धार्जिणा -: शहर भाजपा चा आरोप* *शेतकरी व व्यापारी बचाव, चा वडगाव भाजपा चा नारा*

 

वडगाव (मावळ) :-दि. ११.०३.२०२४ -: शहरातील शेतकरी व व्यापारी यांच्या बचावार्थ शहर भाजपा पदाधिकारी यांनी नगर पंचायतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण निकम (CEO) यांच्यासमोर आक्रमक भूमिका घेत असताना,स्थानिक भूमिपुत्र यांचे फायद्याचा कोणताही विचार न करता बिल्डर धार्जिन DP प्यान बनविण्यात आला असा आरोप केला आहे,विकास आराखडा होतं असताना कोणते प्रस्ताव नुकसानकारक आहेत, कोणत्या प्रस्तावांमध्ये बदल करणे जरुरी आहे तसेच कोणत्या प्रस्तावांची अजिबातच गरज नाही याचे विस्तृत विवेचन केले.

Advertisement

यामध्ये प्रामुख्याने क्र.1,वडगाव बाजार पेठेतील रस्ता हा 15 ते 18 मीटर रुंदीचा केलेला असून तो 10 ते 12 मीटर चा असावा. क्र 2, माघील 10वर्षांमध्ये जिल्हाधिकारी, यांचेकडून मंजूर झालेल्या ओपन स्पेस एमिनिटी स्पेस ह्या जागा आपण प्रथम पब्लिक युटीलिटी, म्हणजेच क्रिडांगण, अथवा गार्डन, व्यायामशाळा, वा अन्य बाबींसाठी, नागरिकांच्या सोयीकारिता ताब्यामध्ये घ्यावेत, तसेच स्थानिक शेतकरी यांनी अनेक वर्षां पासून जपून ठेवलेल्या जमिनींवर टाकलेले आरक्षण काढून, ते त्वरित रद्द करावे. क्र 3, आंबेडकर कॉलनी मधील, हातावर पोट भरणारे गोरंगरीब जनतेच्या घरावर पार्किंग व किफायतशीर घरे याकरिता आरक्षित दाखवले आहे, ते सुद्धा रद्द करणेत यावे. क्र 4, शेतकऱ्यांच्या माळरान सपाट जमिनीवर वनिकरण असा शेरा दिसत असून सुद्धा रद्द करणेत यावा. असे प्रमुख मुद्याचा गांभीर्याने विचार करून वडगाव मधील सर्व सामान्य कामगार वर्ग, शेतकरी आणि व्यापारी यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मागणी वडगाव शहर भाजपा ने निवेदनद्वारे व प्रत्यक्ष बोलून मुख्यधिकारी प्रविण निकम यांचेशी सकारात्मक चर्चा केल्याचे भाजपा शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी सांगितले. यावेळी निवेदनावर स्थानिक व्यापारी व शेतकरी यांचे सह्या घेऊन निवेदन देणेत आले. याप्रसंगी मा सभापती गुलाबराव म्हाळसकर, मा उप सभापती गणेशआप्पा ढोरे,मनसे तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, मा प्रभारी सरपंच संभाजी म्हाळसकर,सचिन(बाळा) ढोरे,मा अध्यक्ष सोमनाथ ढोरे,किरण भिलारे,मा नगरसेवक किरण म्हाळसकर, भुषण मुथा,शरद मोरे,रविंद्र म्हाळसकर,गणेश भेगडे,युवक अध्यक्ष विनायक भेगडे, सरचिटणीस मकरंद बवरे,वडगाव मनसे अध्यक्ष तानाजी तोडकर, शांताराम म्हाळसकर,मा ग्रा प सदस्य,महादू कुडे, महेंद्र म्हाळसकर,प्रफुल कुलकर्णी आदिजण उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page