*तळेगाव येथील कन्याशाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील सर सेनापती उमाबाई दाभाडे कन्या शाळा येथे प्रवेशोत्सव व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या संपादिका रेखा भेगडे,तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे तसेच परिसरातील अंगणवाडी शिक्षिका शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच पालक वर्ग उपस्थित होते.
प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने शाळेतील दीडशे विद्यार्थिनींना मोफत पाठ्यपुस्तके,लोकसहभागातून स्कूल बॅग ,वॉटर बॉटल ,शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिता तिकोने यांनी केले. सूत्रसंचालन निकिता शितोळे यांनी केले.आभार विक्रांती गरड यांनी मानले.यावेळी वैशाली साबळे,सागर साबळे यांनी सहकार्य केले.