सिंधी समाजातील स्वातंत्र्यवीर हेमू कलानी यांच्या १०१ व्या जयंती निमित्त पिंपरी येथील अखंड सिंधी समाजाच्या वतीने पिंपरी येथील हेमू कलानी उद्यान येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि आदरांजली वाहण्यात आली.
पिंपरी चिंचवड :
दिनांक २३ मार्च वार शनिवार रोजी सकाळी साडे आठ वाजता सिंधी समाजातील स्वातंत्र्यवीर हेमू कलानी यांच्या १०१ व्या जयंती निमित्त पिंपरी येथील अखंड सिंधी समाजाच्या वतीने पिंपरी येथील हेमू कलानी उद्यान येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि आदरांजली वाहण्यात आली या वेळी बोलताना प्राध्यापीका विनीता बसंतानी यांनी सांगितले की हेमु कलानी यांचा जन्म २३ मार्च 1923 रोजी सध्याच्या पाकिस्तानातील सिंध प्रांतातील संककर या ठिकाणी झाला अत्यंत तरूण वयात त्यांनी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेशी संलग्न असलेल्या स्वराज सेना या संघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीत उडी घेऊन ब्रिटिश अधिकाऱ्यांना घेऊन जाणारया रेल्वे गाडी च्या मार्गावर रुळ उखडून टाकला अशी माहिती दिली
या वेळी अखंड सिंधी समाजातील मनोहर जेठवानी,श्रीचंद नागरानी, अजित कंजवानी, हिरालाल रिझवानी, महेश मोटवानी,राजु आसवानी, किरण रामनानी,नंदू नारंग, वनिता बसंतानी, हरेश गंगवानी, कैलाश बजाज, प्रकाश भोजवानी, तात्या कोल्हे, प्रदिप नचनानी, डॉ अमित निमाणे, सुनील कुकरेजा,नितु मुसकान, प्रेरणा खटवानी, मुस्कान जेठानी,पुजा मुळचंदानी,श्री भोजनाजी आदी उपस्थित होते.