*श्री शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे शहरातील राव काॅलनी येथे “श्री शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न झाला. यानिमित्त १०वी १२वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. श्री डोळसनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष समीर शंकरराव भेगडे यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब, राणी साहेब, बाजीप्रभू देशपांडे, तसेच मावळे अशा विविध वेशभूषा करून बालचमू सहभागी झाले होते. या वेळी महिलांनी पोवाडा सादर केला. मान्यवरांच्या हस्ते १०वी, १२वीतील १६ विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह” देऊन गौरव करण्यात आला.
स्वागत विशाल थोरात यांनी केले.प्रास्ताविक समीर भेगडे यांनी केले. प्रमुख वक्ते प्रशांतजी दिवेकर यांनी मार्गदर्शन केले, सुत्रसंचालन श्रीकांत मेढी यांनी केले. आभार मयुर शिंदे यांनी मानले.
यावेळी महिंद्रा कंपनीचे अधिकारी प्रसाद पादीर, रोहित थोपटे,अमित पाटील, अनिकेत शेटे, हर्षल गरूड, योगेश उभे, पद्मनाभ पुराणिक, अंकुश गायकवाड, संतोष पंडीत, अशोक पाटील, अरुण बैरागी, भागवत मोरे, दिलीप शृंगारपुरे, दत्ता जायगुडे तसेच विद्यार्थ्यांचे पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.