रमेश गनगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…
कोंढवा पुणे
सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण भारतचे अध्यक्ष रमेश गणगे यांच्या वाढदिवसानिमित्त राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, दप्तर, शूज, पेन्सिल, पेन, अशा अनेक साहित्यांचे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
राधाकृष्ण विद्यालयाच्या वतीने रमेश गणगे यांचा सन्मान करण्यात आला व त्यांना संस्था, शिक्षक, विद्यार्थी यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुनील शेठ परदेशी, सचिव दिलीप शेठ परदेशी, राधाकृष्ण विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नागनाथ काळे सर,सुनील पानसरे सर, अशोक शेंडगे सर, निकम मॅडम, काळे मॅडम, व सर्व शिक्षक उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मदने, नितीन जामगे, विपुल भाऊ ठक्कर, रमेश चलवादी, यश बडदे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. किरण घोरतळे सर यांनी केले तर आभार सुनील पानसरे सर यांनी केले.