पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेचा निकाल १०० टक्के
पवनानगर : – आज एस.एस.सी शालान्त परीक्षा परिक्षेचा निकाल जाहीर झाला यामध्ये पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेचा निकाल १०० टक्के निकाल लागला असून सदर परिक्षेसाठी ११८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते येथील सिध्दी दत्तात्रय सुतार हिने ९४.४० टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला तर हर्षल सुनिल चव्हाण – ९०.८० टक्के याला द्वितीय क्रमांक तर अस्मिता संजय कालेकर हिने ८८.२० टक्के हीने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
पवना विद्या मंदिर पवनानगर शाळा ही केंद्र शाळा असून या शाळेवर परिसरातील वारु कोथुर्णे माध्यमिक शाळा , छत्रपती शिवाजी माध्यमिक शिवली, संत ज्ञानेश्वर विद्यानिकेतन अजिवली,करुंज माध्यमिक विद्यालय करुन, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय बऊर , ज्ञानेश्वर विद्यालय दिवड आणि संत तुकाराम माध्यमिक विद्यालय शिवणे या आठ शाळेतील विद्यार्थीनी ४२२ परीक्षा दिली होती. यासाठी पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गशिक्षक गणेश ठोंबरे, बापुसाहेब पवार, रोशनी मराडे, महादेव ढाकणे, राजकुमार वरघडे,मंजुषा गुर्जर, वैशाली वराडे,सुनिता कळमकर,भारत काळे, वैशाली कोयते,सुमन जाधव, वर्षा पोखरकर यांच्यासह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेऊन उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवली.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष बाळा भेगडे म्हणाले की,कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन उत्तम गुण संपादन केले आहे त्याच्या यशाबद्दल शिक्षक व पालकाचे अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
यावेळी बोलताना संतोष खांडगे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये खरी गुणवत्ता असते हे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांने दाखवून दिले कोणत्याही खाजगी क्लासेस व सुविधा नसताना शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाच्या आधारावर चांगले यश मिळवले आहे
सर्व यशस्वी शिक्षकांचे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळाभाऊ भेगडे, संस्थेचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संतोष खांडगे, उपाध्यक्ष गणेश खांडगे सहसचिव नंदकुमार शेलार खजिनदार राजेश म्हस्के व संचालकांनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.