नितीन विश्वनाथ भोगले यांची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या आयुष्यमान भारतच्या समितीवर सह संयोजक म्हणून निवड झाली
पिंपरी चिंचवड :
मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा च्या वतीने विविध समित्या चे पदाधिकारी यांचा पदग्रहण संपन्न झाला
या मधे युवा मोर्चा, महिला मोर्चा, वैद्यकीय प्रकोष्ट, आयुष्यमान भारत, दिव्यांग प्रकोष्ट,कायदा प्रकोष्ट, किसान मोर्चा, आदी चां समावेश होता या वेळी प्राधिकरणाचे पूर्व अध्यक्ष सदाशिव खाडे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजुभाऊ दुर्गे,सरचिटणीस संजय मंगोडेकर, विलास मडेगेरी, नामदेव ढाके ,अजय पाताडे , नगरसेविका शारदाताई सोनवणे, चिंचवड विधानसभा निवडणुक प्रमुख काळुराम डांगे,युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे , प्रदेश सचिव अजित कुलथे, तेजस्विनी कदम,युवा मोर्चा शहर अध्यक्ष तुषार हिंगे, बिभीषण चौधरी विविध प्रकोष्ट चे अध्यक्ष आदी उपस्थित होते.
नितीन विश्वनाथ भोगले यांची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या आयुष्यमान भारत च्या समिती वर सहसंयोजक म्हणून निवड झाली त्या चे पत्र आ.उमाताई खापरे आणि शहर अध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या हस्ते देण्यात आले.या वेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यालय प्रमुख संजय परळीकर यांची अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल विषेष गौरव करण्यात आला
कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.