श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेचा मावळ तालुक्यात डंका ‘ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ स्पर्धेत कार्ला श्री एकविरा विद्या मंदिर शाळेचे यश

कार्ला- महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या वतिने राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या वतिने शाळांकरिता राबविण्यात आलेल्या ‘ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या श्री एकविरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर काॕलेजचा मावळात द्वितीय क्रमांक मिळवत घवघवीत यश मिळवले आहे.

Advertisement

मावळ तालुक्यातील प्राथमिक व खाजगी एकूण ४२९ शाळामंधून खाजगी शाळेमध्ये तालुक्यात द्वितीय स्थान मिळवले.
यापूर्वी श्री एकविरा विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थी शिष्यवृती व एन एम एस एस परिक्षेत गुणवत्ता यादीत चमकत असून पुन्हा या स्पर्धेत देखील आपली चमक मावळ तालुक्यात दाखवली आहे.
विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे यांंच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक संजय वंजारे व सर्व शाळेतील शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचा-यांच्या सहकार्याने हे यश मिळवण्यात आले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे सचिव संतोष खांडगे ,उपाध्यक्ष गणेश खांडगे ,सह सचिव नंदकुमार शेलार,खजिनदार राजेश म्हस्के, माजी सभापती शरदराव हुलावळे,मा पं समिती सदस्य दिपक हुलावळे,सरपंच दिपाली हुलावळे,उपसरपंच किरण हुलावळे सर्व ग्रामपंचात सदस्य व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सर्व संचालक व शिक्षक शिक्षेके-तर कर्मचारी पालक कार्ला ग्रामस्थ या सर्वांनकडून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page