मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलच्या अध्यक्ष पदी ज्योती भरत राजिवडे यांची निवड
वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलच्या अध्यक्ष पदी ज्योती भरत राजिवडे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी दिव्यांग सेलच्या पुणे जिल्हाध्यक्षा पुष्पा गोसावी यांनी त्यांची नियुक्ती केली.
आमदार सुनिल शेळके जिल्हा उपाध्यक्षा मंगल धोत्रे यांच्या उपस्थितीत राजिवडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.ज्योती राजिवडे म्हणाल्या,” आमदार सुनील शेळके यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन माझ तळेगाव शहराचा चांगल काम पाहुन मला तालुक्यात काम करण्याची संधी दिली. मी तालुक्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून लोकांच्या अडचण सोडवण्याचा प्रयत्न करीन.