लोणावळा सायकलिंग क्लब चा एक आगळा वेगळा पक्षी निरीक्षण छंद
लोनावाला: साइकलिंग क्लब लोनावला नेहमीच सायकल चालवा निरोगी राहा, पर्यावरण स्वच्छ ठेवा हा मंत्र आपल्या कृतितून समाजा ठेवण्याचा प्रयत्न करते असते.
या वर्षी या कल्ब चे सद्यस्य श्री. भरत भाऊ भरने आणि नितेश कुटे यांच्या संकल्पनेतुन भिगवन पक्षी निरिक्षण स्थल बघन्याची योजना आखली. दिनाक १७ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.३० मि. लोनावाला टोल नाका येथुन साइकलिंग क्लब चे सद्स्य निघाले. वाटे मध्ये are किलोमीटर असलेले भूलेश्वर शंकराचे यादव कालीन मंदिर याचा जिर्णोद्धार पेशव्यांच्या काळामध्ये करण्यात आला होता हे मंदिर अतिशय रेखीव असे मंदिर आहे या मंदिराला सुद्धा सायकलिंग क्लब लोणावळ्याच्या सदस्यांनी दर्शन घेऊन आपला भिगवण प्रवास सुरू दुपारी सुरू केला. लोणावळा ग्रामीण पोलीस अधीक्षक आयपीएस श्री सत्य साई कार्तिक यांच्या संकल्पनेतून नशा मुक्त समाज याचाच एक भाग म्हणून मंदिराच्या परिसरामध्ये आलेल्या भाविकांना आपल्या मधुर वाणीने श्री भरत भरणे यांनी सायकल चालवण्याचे महत्त्व व कुठलेही व्यसन न करण्याचे आव्हान केले त्यामुळे आलेले सर्व भक्तगण या सायकलिंग क्लबचे खूप कौतुक करत होते.
संध्याकाळी नऊच्या सुमारास सर्व सदस्य भिगवन येथे मुक्कामी पोचले दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी सर्व सदस्य पहाटे पाच वाजताच उजनी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये असलेले पक्षी निरीक्षण केंद्रावरती पोहोचले त्यामुळे त्यांना जगातील विविध भागातून आलेले असंख्य पक्षी आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला मिळाले आणि त्यामुळे त्यांना एक वेगळाच निसर्गाच्या सानिध्यामध्ये पक्षी निरक्षणाचा आनंद मिळाला या पक्षी निरीक्षण सहलीमध्ये सायकलिंग क्लब लोणावळा चे सदस्य श्री भरत भरणे, श्री नितेश कुटे, श्री विजय येवले, श्री कैलाश कडूसकर, श्री अनिल गावडे, डॉ.प्रवीण लाटणे, श्री सिद्धेश्वर इंगळे, धिरज येळसंगे, डॉ. प्रवीण पंडित, श्री. कमल परदेशी (तळेगाव) हे सदस्य सहभागी झाले होते.
या सहली साठी सिंहगड लोणावळा संकुल संचालक डॉ. एम.एस. गायकवाड यांनी सर्व सायकलिंग क्लब लोणावळा चे अभिनंदन केले.