लायन डॉक्टर अनिकेत काळोखे बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्डने सन्मानित
लोणावळा :
दिनांक 15 मार्च रोजी मॅपल रिसॉर्ट लोणावळा येथे लायन्स क्लब इंटरनॅशनल चे रिजनल कॉन्फरन्स चा कार्यक्रम संपन्न झाला त्यामध्ये तळेगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष अनिकेत काळोखे यांना बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड मिळाला व त्यांच्या क्लबला बॅनर प्रेझेंटेशन साठी तिसरा क्रमांक चा अवॉर्ड मिळाला त्यामध्ये त्यांनी गुजराती बारात अशी थीम त्यांना मिळाली होती त्याच. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने दीपक भाईशाह यांनी अपंग लोकांसाठी 15 विल चेअर्स चे डोनेशन केले.
या कार्यक्रमासाठी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विजय भंडारी तसेच अनेक पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व रीजन मधल्या 16 क्लबचे प्रेसिडेंट ट्रेझरर व सेक्रेटरी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी महाबोध जी महाराज यांचे प्रवचन ठेवण्यात आले होते. त्याचा सर्व लायन्स मेंबरने अनुभव घेतला. पूर्ण सोहळा दिमागदार पद्धतीने पार पडला.