दहिवली सामुदायिक विवाहसोहळ्यात पाच जोडपी विवाहबध्द
कार्ला : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतिने संस्कारशाळा आश्रम दहिवली कार्ला या ठिकाणी घेण्यात आलेल्या सामुदायिक विवाहसोहळ्यात मावळ तालुक्यातील दहा परिवारातील पाच वधू वरांचा शुभविवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष असून
सामुदायिक विवाह सोहळ्याच्या दिवशी सकाळी दहा वाजता साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर दुपारी बारा वाजता हळदी समारंभ, त त्यानंतर भोजन व्यवस्था मुरारीलाल शर्मा यांंच्या वतिने तर सायंकाळी ०५ वा ० ५ मि वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या नववधूला सोन्याचे मंगळसूत्र व कर्णफुले, नथनी, पैंजण ,जोडवी व मनगटी घड्याळ देण्यात येणार आहे. तसेच साखरपुड्याची साडी व लग्नाचा शालू, संसार उपयोगी वस्तू देखील आयोजकांकडून देण्यात आले.
वधू वरांना साखरपुड्याचा व लग्नाचा पोशाख, मनगटी घड्याळ देखील देण्यात आले.
सोबतच बँड पथक वाजंत्री रथ यांंच्या गजराने वरराज्याची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी श्रीरंग बारणे,बापुसाहेब भेगडे,गणेश भेगडे,भाऊसाहेब गुंड,दिपक हुलावळे,रविंद्र भेगडे,मिलिंद बोत्रे ,बाळासाहेब भानुसघरे,सुरेश गायकवाड ,जितेंद्र बोत्रे,गणपत भानुसघरे,निखिल कविश्वर,कैलास गायकवाड,लक्ष्मण बालगुडे,मधुकर पडवळ,बाळासाहेब भानुदास,बबनराव माने, यांची प्रमुख उपस्थीती होती.
या विवाहसोहळ्याचे आयोजन सोहळा समितीचे अध्यक्ष अमोल भेगडे,मानद अध्यक्ष सचिन भानुसघरे , कार्याअध्यक्ष मनोज येवले संस्थापक माजी सभापती शरद हुलावळे, महिला अध्यक्षा सायली बोत्रे, चंद्रकांत शेलार, संतोष केदारी, संदीप तिकोणे,सदस्य भाऊसाहेब हुलावळे,मुरारीलाल शर्मा,सुनिल गरुड,अशोक पडवळ, मच्छिंद्र केदारी मंगेश हुलावळे ,मारुती, येवले,नितिन वाडेकर ,विशाल जमदाडे, सीमा आहेर, दिलीप खेंगरे,एकनाथ गायकवाड, सिमा बालगुडे, संगीता केदारी, सोमनाथ सावंत,भाऊसाहेब मापारी,संदिप भानुसघरे,शंकर पडवळ,नवनाथ कोंडभर,प्रशांत ढाकोळ ,सुनिल गायकवाड,नितिन देशमुख,खंडु शेलार,बाबाजी सोंडेकर ,राम येवले,सतीश मोरे,शांताराम ढाकोळ,किसन येवले,भगवान देशमुख, शेखर दळवी ,खंडु आहेर,बबन गरुड,उल्हास दळवी अक्षय हुलावळे,किसन येवले,सुभाष देशमुख यांच्यावतीने करण्यात आले होते. प्रस्ताविक शरद हुलावळे,सचिन भानुसघरे व अमोल भेगडे यांनी केले.
सूत्रसंचालन भाऊसाहेब हुलावळे, सदिप तिकोणे,शंकर पडवळ,मच्छिंद्र केदारी यांनी केले.
: