बाहेरून आलेल्या व वाढत्या श्वानांच्या संख्येने त्रस्त नागरिकांनी केली श्वानांच्या बंदोबस्त करण्याची मागणी…!*
तळेगाव दाभाडे :-
साधारण गेल्या वर्षभरापासून तळेगाव दाभाडे परिसरामध्ये भटके श्वान यांची संख्या अतिशय वाढली असून कॉलनी भागात देखील यांची संख्या वाढलेली दिसत आहे अनेक ठिकाणी झुंडीच्या झुंडी करून उभे असणारे श्वान हे रात्रीच्या वेळेस येणाऱ्या कामगार वर्ग तसेच दुचाकी चालक यांच्या पाठीमागे लागून दुचाकी घसरण्याचे किंवा दुचाकी चालक जखमी होण्याच्या अनेक घटना तळेगाव परिसरात घडत असून लहान मुलांना शाळेतून आणताना महिलांना देखील भीती मात्र भीती भीती वाटत असल्याची अनेक महिला वर्गाची तक्रार देखील आहे.
काल कडोलकर कॉलनी भागात सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या एका महिलेवर अचानक एका भटक्या श्वानाने हल्ला केल्यावर परिसरातील नागरिकांनी आराडाओरड केल्यानंतर सदर श्वान तेथून पळून गेले त्यानंतर महिलेस दवाखान्यात दाखल केलेले आहे
गाव भागातील मस्करनीस कॉलनी दोन ,जव्हेरी कॉलनी, लिंब फाटा, विजय खिंड अशा अनेक भागात अनेक श्वान हे बाहेरून सोडले जात असल्याचा आरोप देखील नागरिक करताना दिसत आहे यावर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
तीन चार महिन्या पूर्वी साधारण सकाळी आठ वाजता वतन नगर परिसरामध्ये सात-आठ कुत्र्यांच्या झुंडीने तीन लहान मांजरांच्या पिल्लावर हल्ला करत त्यांना ठार केले सामाजिक कार्यकर्ते गणेश गरुडे ,चेतन ओव्हाळ यांनी या मांजरीच्या पिल्लांना बचावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश आले नाही भटक्या कुत्र्यांची समस्या ही खूप वाढली असून येणाऱ्या भविष्यकाळात माणसांवर तसेच लहान मुलांना देखील हल्ल्याचे प्रमाण वाढू शकते यामुळे नगर परिषदेने याचा गंभीरपणे विचार करून यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.